www.24taas.com, पाटणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल बिहारींविरूद्ध केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलच तापलं आहे. प्रत्येक बिहारीला हाकलून देण्याच्या धमकीमुळे बिहारी नेतेही बिथरले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्षानेही राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
जेडी (यू) चे प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे की, मला असे वाटते की, ठाकरे परिवार आणखी एका राज्यघटनेच्या शोधात आहे व त्यानुसारच ते काम करीत आहेत. राज ठाकरे आणखी एक वाद व हिंसा करु इच्छित आहेत. याचबरोबर काँग्रेस पक्ष राज ठाकरेंना मोठा करण्यात हातभार लावत आहे.
दरम्यान, राज्यातील भाजपचे मनसेशी सलोख्याचे संबंध असताना बिहार भाजपने राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, असे म्हटले आहे. तसेच राज ठाकरे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने वातावरण तयार करीत आहेत असा आरोप केला.