'चाचा चौधरी'चा 'प्राण' हरपला!

‘चाचा चौधरी’ आणि ‘साबू’ या कार्टुन कॅरेक्टरचे जनक प्राण यांचं निधन झालंय.

Updated: Aug 6, 2014, 01:11 PM IST
'चाचा चौधरी'चा 'प्राण' हरपला! title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : ‘चाचा चौधरी’ आणि ‘साबू’ या कार्टुन कॅरेक्टरचे जनक प्राण यांचं निधन झालंय.

‘चाचा चौधरी’ या कार्टुनच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले प्रसिद्ध कार्टुनिस्ट ‘प्राण’ अंतिम समयी 76 वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरनं त्रस्त होते. गेल्या 10 दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री त्यांनी अंतिम श्वास घेतला. बुधवारी दुपारी 2.30 वाजता त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत.  

प्राण यांनी 1960 मध्ये दिल्लीहून निघणाऱ्या ‘मिलाप’ या वर्तमानपत्रात कार्टुनिस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘चाचा चौधरी’ हे प्रसिद्ध कार्टुन कॅरेक्टर त्यांनी हिंदी बालपत्रिका ‘लोटपोट’साठी बनवलं होतं. त्यानंतर, मात्र ते कॉमिक जगतातले सगळ्यात सफल कार्टुनिस्ट ठरले. 

प्राण यांचं संपूर्ण नाव प्राण कुमार शर्मा... त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1938 रोजी लाहोरमध्ये झाला होता. चाचा चौधरी आणि साबू यांच्याशिवाय प्राण यांनी डायमंड कॉमिक्ससाठी रमन, बिल्लू आणि श्रीमतीजी सारखे कॉमिक कॅरेक्टरचीही निर्मिती केली. 

प्राण यांनी ज्या काळात कॉमिक कॅरेक्टर्सची निर्मिती केली त्यावेळी भारताला हा प्रकार संपूर्णपणे नवा होता...  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.