नवी दिल्ली : अपेक्षेनुसार केंद्र सरकारने अध्यादेश काढून यंदापुरती NEETनुसार वैद्यकीय प्रवेशाला स्थगिती दिलीये. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली.
सर्व राज्यांमधल्या सरकारी महाविद्यालयांना या वर्षासाठी NEET बंधनकारक नसेल. यामुळे महाराष्ट्रातल्या ४ लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. खासगी संस्थांना मात्र अपेक्षेनुसार केंद्र सरकारनं दिलासा दिलेला नाही.
हा अध्यादेश राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवण्यात आलाय. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर अध्यादेश लागू होईल. या अध्यादेशामुळे सुप्रीम कोर्टानं नीटबाबत दिलेल्या आदेशाला १ वर्षाची स्थगिती मिळेल.