हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघायला हव्यात, ज्या रुढी ही तावून सुलाखून सिद्ध होणार नाहीत, अशा रुढींना तिलांजली द्यायला हवी, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतच जयपूरमध्ये केलं. 

Updated: Sep 15, 2015, 12:32 PM IST
हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ title=

जयपूर : हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघायला हव्यात, ज्या रुढी ही तावून सुलाखून सिद्ध होणार नाहीत, अशा रुढींना तिलांजली द्यायला हवी, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतच जयपूरमध्ये केलं. 

संघाच्या स्तंभ लेखकांसाठी आयोजित परिषदेच्या समारोपाच्या भाषणात सरसंघचालकांनी हे विधान केलंय. पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढत्या प्रभावावर टीका करताना हिंदू कौटुंबिक मूल्यांची पाठराखण केली.

त्याच प्रमाणे चुकीच्या रुढी परंपरांना हिंदू धर्मियांनी झुगारून दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे शाश्वत जीनव मूल्यांवर आधारित जगात जे काही चांगलं आहे, आपल्या जीवनशैलीत सामावून घेतली पाहिजेत असेही सरसंघचालकांनी म्हटलंय. सणासुदीच्या निमित्तानं आलेलं सरसंघचालकांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.