२००५ आधीच्या नोटा बंद होण्यासाठी केवळ ११ दिवस

२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी १ जानेवारी २०१५ पासून होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे २००५च्या आधीच्या नोटा असतील तर त्या तात्काळ बदलून घ्या.

Updated: Dec 22, 2014, 02:53 PM IST
२००५ आधीच्या नोटा बंद होण्यासाठी केवळ ११ दिवस  title=

नवी दिल्ली : २००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी १ जानेवारी २०१५ पासून होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे २००५च्या आधीच्या नोटा असतील तर त्या तात्काळ बदलून घ्या.

आता जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांकडे आता फक्त ११ दिवस शिल्लक आहेत. चलनात असलेल्या नोटांत संगती असावी, तसेच बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वीच्या छापलेल्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतलाय.

२००५च्या आधीच्या नोटा नागरिकांकडे असल्यास त्या बदलून घेण्यासाठी १ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत १४४.६६ कोटी नोटा नागरिकांना बदलून देण्यात आल्या आहेत.

या नोटांचे एकत्रित मूल्य ५२,८५५ कोटी रुपये आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २००५ नंतरच्या नोटांवर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष फिचर आहेत. या नोटांची नक्कल करणे शक्य नाही. बनावट नोटांचा प्रसार रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही खबरदारी घेतली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.