बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलीनं केली 2 वर्षीय मुलीची हत्या

दिल्लीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय. अकरावीच्या विद्यार्थिनीला शेजारच्या बाईचं रागावणं इतकं मनाला लागलं की, तिनं त्या बाईच्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केली. घटना 10 जूनची आहे. चिमुरडीला घरी टरबूज खायला बोलावून त्यानं तिची गळा दाबून हत्या केली. 

PTI | Updated: Jun 18, 2015, 01:44 PM IST
बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलीनं केली 2 वर्षीय मुलीची हत्या title=

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय. अकरावीच्या विद्यार्थिनीला शेजारच्या बाईचं रागावणं इतकं मनाला लागलं की, तिनं त्या बाईच्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केली. घटना 10 जूनची आहे. चिमुरडीला घरी टरबूज खायला बोलावून त्यानं तिची गळा दाबून हत्या केली. 

एनजीओ अधिकारी आणि महिला पोलिसांच्या उपस्थितीत मुलीनं आपल्या या भयंकर कृत्याची कबुली दिली. तिनं सांगितलं की, काही दिवसांपूर्वी चिमुरडीच्या आईनं सर्वांसमोर तिला रागावलं होतं. याचाच बदला घेण्यासाठी तिनं त्या 2 वर्षीय मुलीची हत्या केली. चिमुकलीला घरी बोलावून तिचा गळा दाबून हत्या केल्याचं तिनं सांगितलं.

10 जूनची ही घटना आहे. अकरावीत शिकणाऱ्या मुलीनं आपल्या शेजारच्या 2 वर्षीय मुलीला घरी टरबूज खायला बोलवलं आणि गळा दाबून तिची हत्या केली. एवढ्यावरच ती थांबली नाही तर आपल्या दप्तरात मुलीचा मृतदेह टाकून तिनं निर्जनस्थळी फेकला. जेव्हा ती मृतदेह दप्तरातून नेत होती. तेव्हा आजुबाजुचे लोक बेपत्ता मुलीचा शोध घेत होते.

दप्तरात टाकलेला मृतदेह घेऊन ती रिक्षात बसली आणि तलावात ते दप्तर फेकून दिलं. आता पोलिसांनी तिला अटक केलीय आणि लवकरच तिच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करण्याच्या तयारीत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.