नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. वर्धन यांचे दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. एक अभ्यासू आणि कुशल तत्वनिष्ठ राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती.
गेल्या महिन्यात पक्षाघातानंतर जी.बी. वर्धन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली. काल त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते आणि त्यांचा श्वासोच्छवासही सामान्य होता. परंतु अचानक त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ए.बी. बर्धन हे कामगार संघटनेचे आंदोलन आणि महाराष्ट्रातील डाव्या राजकारणाचा एक प्रमुख चेहरा होते. 1957 साली अपक्ष उमेदवार म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर त्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) महासचिवपदाची जबाबदारी सांभाळली. आयटक ही भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना आहे.