नवी दिल्ली : सब मिले हुए है, असा आरोप करत प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय असल्याचा दावा करणा-या आम आदमी पार्टीतही सत्ता मिळाल्यानंतर लाथाळ्या आणि कुरघोडीचं दर्शन घडवलयं.
अखेर सत्ता मिळाली की सगळेच पक्षश्रेष्ठी सारखेच वागायला लागतात हेच खरं. सत्ता मिळवणं अवघड असतं पण मिळालेली सत्ता विवेकीपणानं वापरणं त्याहून अवघड असतं, याचं भारतीय राजकारणातलं ताजं उदाहरण म्हणजे आम आदमी पार्टी.
दिल्लीत विरोधकांचा सफाया करुन सत्ता मिळवलेल्या आपची ही कथा. तर मतदारांनी पूर्णपणे नाकारलेल्या काँग्रेसची दुसरीच कथा. सोनिया गांधींनी पक्षाची सूत्र पूर्णपणे सोडलेलीही नाहित आणि राहुल गांधींनी ती पूर्णपणे स्विकारलेलीही नाहीत अशा त्रिशंकू अवस्था सध्या काँग्रसची झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.