तिरुवनंतपुरम : माजी काँग्रेस नेता चेरियन फिलिप यांनी रविवारी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले, महिलांना काँग्रेसमध्ये तिकिट मिळवण्यासाठी लैंगिक संबंध ठेवावे लागतात, असा गंभीर आरोप फिलिप यांनी केला आहे.
फिलिप हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके एंटनी आणि सीएम ओमान चांडी यांचे एकेकाळी जवळचे मानले जात होते.
महिला नेत्यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
काही दिवसांआधी कांग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये तिकीट न मिळाल्याने, त्रिसूरमध्ये शर्ट उतरवून प्रदर्शन केलं होतं. यावर प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिंदू कृष्णाने म्हटलंय, फिलिप यांनी पक्षातील महिलांचा अपमान केला आहे. कृष्णा यांनी म्हटलंय, जर त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही, तर ते कोर्टात जातील.
महिला नेत्यांकडून टीका सहन केल्यानंतरही फिलिप आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. फिलिप यांनी म्हटलंय की, "आपण महिलांविरोधात वक्तव्य केलेलं नाही. फिलिप यांनी म्हटलंय, मला तर अशा नेत्यांची नावं द्यायला हवी होती, जे महिलांचा अपमान करतात, मी अशा नेत्यांच्या विरोधात बोललो, जे महिलांचं शोषण करतात."
काँग्रेसमधील काही गुपितं उघड करेन
फिलिप असंही म्हणतात, ही माझी शालीनता आहे की, मी काँग्रेस मधील अनेक गुपितं अजून उघड केलेली नाहीत, जर तुम्ही मला महिला विरोधी ठरवत असाल, तर मला अनेक घटना उघड कराव्या लागतील, ज्या घटनांमध्ये काँग्रेस नेत्यांकडून महिलांचं शोषण झालं आहे.
माझी पॉलीग्राफी टेस्ट घेतली पाहिजे
जेव्हा एंटनी अध्यक्ष आणि सुधीरन उपाध्यक्ष होते, तेव्हा मी पक्षाचा सरचिटणीस होतो, सुधीरन यांना सर्व माहित आहे, जर बिंदू कृष्णा कोर्टात गेल्या, तर काँग्रेसमधील अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत. माझी पॉलीग्राफी टेस्ट घेतली पाहिजे, माझ्या डोक्यात असेल ते सर्व बाहेर येणार आहे.
फिलिप तिकिट कापल्यापासून नाराज
फिलिप, एंटनी आणि चांडी हे अनेक वर्ष जवळ राहिलेले आहेत, २००१ मध्ये विधानसभा निवडणुकीत तिकिट न दिल्याने फिलिप यांनी बंड केलं होतं, त्यानंतर काँग्रेसचं सदस्यत्व सोडलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.