नवी दिल्ली : दिल्लीतील आपच्या सरकारवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसने माकडचेष्टा सोडून, व्यवस्थित राज्य करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माकडचेष्टा थांबवाव्यात आणि राज्य चालवावे अशा शब्दांत कॉंग्रेसने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम आदमी पक्षाकडे निधीची कमतरता असून नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन आज केजरीवाल यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजवाला बोलत होते.
ते म्हणाले की, "कोणताही पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा जनतेने निवडून दिलेला व्यक्ती आपल्या पक्षाकरिता निधी देण्याबाबतचे आवाहन करू शकत नाही. 'ते पुढे म्हणाले, 'मला वाटते की केजरीवाल यांनी आपल्या पदाचा अवमान केला आहे. हा प्रकार न्याय नाही आणि योग्यही नाही.
तसेच 'केजरीवाल यांनी अशा प्रकारच्या माकडचेष्टा थांबवाव्यात आणि सरकारच्या मुलभूत तत्वापासून जनतेचे लक्ष विचलित करू नये' असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आधी त्यांच्या पक्षप्रमुखाने गोळा दिल्लीवासियांसाठी तसेच 'इंडिया फर्स्ट'साठी गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा संपूर्ण हिशोब द्यावा' असेही सूरजवाला पुढे म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.