हिंदू मुलीशी इखलाकच्या मुलाचे संबंध म्हणून दादरीकांड

 दादरीकांड हे खासगी भांडणाचा परिणाम होता, असा दावा आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला  आहे. मोहम्मद इखलाक याच्या दोन मुलांपैकी एकाचे हिंदू मुलीशी प्रेमसंबंध होते. यात राजकारण करण्यात आले असून त्याला चुकीच्या पद्धतीने गोमांसशी जोडले असल्याचा दावाही एबीव्हीपीने केला आहे. 

Updated: Oct 26, 2015, 01:50 PM IST
हिंदू मुलीशी इखलाकच्या मुलाचे संबंध म्हणून दादरीकांड title=

नवी दिल्ली :  दादरीकांड हे खासगी भांडणाचा परिणाम होता, असा दावा आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला  आहे. मोहम्मद इखलाक याच्या दोन मुलांपैकी एकाचे हिंदू मुलीशी प्रेमसंबंध होते. यात राजकारण करण्यात आले असून त्याला चुकीच्या पद्धतीने गोमांसशी जोडले असल्याचा दावाही एबीव्हीपीने केला आहे. 

सीतापूरमध्ये एक ते तीन नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक राज्य स्तरीय संमेलनापूर्वी एबीव्हीपीने दावा केला आहे.  इखलाक यांना त्यांच्या घराच्या बाहेर काढून संतप्त जमावाने हाणामारी करून ठार केले होते. अफवा परसविण्यात आली की तो गोमांस खात होता तसेच त्याने घरात गोमांस ठेवण्यात आले होते. यावेळी इखलाकच्या २२ वर्षीय मुलगा दानिश याला जमावाने झोडपले होते. तो गंभीर जखमी झाला होता. 

दानिशचा मोठा भाऊ सरताज भारतीय वायुदलात टेक्निशयन म्हणून चेन्नईमध्ये कामाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार एबीव्हीपीने स्पष्ट केले नाही की दोन्ही भावांपैकी कोणाचे हिंदू मुलीशी संबंध होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी एबीव्हीपी तुष्टीकरणाच्या राजकारणावर चर्चा करणार आहेत त्यात बाबरीचा उल्लेख करण्यात येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.