उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमध्ये रुग्णांची चिंता न करता रात्रभर डिजेच्या तालावर नाच-गाणं चालू होतं. हॉस्पिटलच्या स्टाफच्या मुलींचं लग्न असल्यामुळे सारे नियम धाब्यावर बसवत सायलन्स झोनमध्ये लग्नसमारंभाला परवानगी देण्यात आली.
या आवाजामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर दुसरीकडे विवाह समारंभात सहभागी झालेले नाचण्यात दंग होते. मात्र, कोणीही रुग्णांची चिंता केली नाही.
हॉस्पिटलमधील स्टाफच्या मुलीचं लग्न असल्यामुळे हॉस्पिटलच्या आवारात लग्नाची परवानगी दिल्याचं येथील कर्मचा-याच म्हणण आहे.
Patients suffer as staff attends wedding of an employee's daughter in the premises of a Bulandshahr hospital(Feb 28)https://t.co/5ekD9J7r0V
— ANI (@ANI_news) March 1, 2016