दिल्लीतील ती छेडछाड की पब्लिसिटी स्टंट, धक्कादायक खुलासा

दिल्लीतील टिळकनगर सिग्नलवर रात्री साडेआठच्या सुमारास एका तरुणीसोबत अश्लिल वक्तव्य करणाऱ्या तरुणाचा फोटो तिनं फेसबुकवर टाकला... बघता-बघता हा फोटो वायरल झाला आणि पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली.

Updated: Aug 25, 2015, 06:17 PM IST
दिल्लीतील ती छेडछाड की पब्लिसिटी स्टंट, धक्कादायक खुलासा title=

नवी दिल्ली: दिल्लीतील टिळकनगर सिग्नलवर रात्री साडेआठच्या सुमारास एका तरुणीसोबत अश्लिल वक्तव्य करणाऱ्या तरुणाचा फोटो तिनं फेसबुकवर टाकला... बघता-बघता हा फोटो वायरल झाला आणि पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली.

पण आता सरबजीतची बाजू पुढे आलीय. त्यानं फेसबुकवरही स्पष्टीकरण दिलंय. पीडित तरुणी सिमरन कौरनं हे सगळं पब्लिसिटीसाठी केल्याचा त्याचा आरोप आहे. आपण रेड सिग्नल क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होतो, तिनं थांबवून शिव्या घातल्या आणि अश्लिल हावभाव केल्याचा त्याचा आरोप आहे. 

आणखी वाचा - छेड काढणाऱ्या भामट्याचा फोटो तरुणीनं फेसबुकवर टाकला, फोटो वायरल 

तसंच त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की, मुलाची अशी काहीच चूक नव्हती त्यानं अश्लिल वक्तव्य आणि छेडछाड केली नाही. साक्षीदार व्यक्ती सरबजीतच्या गाडीच्या मागेच गाडीवर आपल्या पत्नीसह होते. 

ऐका काय आहे म्हणणं साक्षीदार आणि आरोपी सरबजीतचं - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.