नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
दरात कपात झाल्यास ऑगस्ट महिन्यानंतर पेट्रोलचे दर सलग सहाव्यांदा तर डिझेलचे दर दुसऱ्यांदा कमी होतील. दिवाळीपूर्वी सरकारनं डिझेलच्या दरात साडेतीन रुपयांची कपात केली होती. हे दर कमी झाल्यास सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती कमी झाल्यानं हे दर कमी होण्याची शक्यता आहे. 31 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.