पोलिसांवर दबाव न टाकण्याचा यूपीतील खासदारांना मोदींच्या सूचना

भाजपच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचना

Updated: Mar 23, 2017, 11:32 AM IST
पोलिसांवर दबाव न टाकण्याचा यूपीतील खासदारांना मोदींच्या सूचना

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजपच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. या दरम्यान पंतप्रधान निवासवर सगळ्या खासदारांचा सन्मान देखील केला गेला.

पंतप्रधान मोदींनी या दरम्यान यूपीतल्या खासदारांना ताकीद देखील दिली. खासदारांना सांगितलं की, तो कोणत्याही प्रकरणात अँटी रोमियो स्क्वाडसह पोलिसांवर कोणताही दबाव आणणार नाहीत. मोदींनी खासदारांना ट्रांसफर आणि पोस्टिंगपासून लांब राहण्यास सांगितलं आहे. सोबतच मेहनतीने काम करण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.