नवी दिल्ली : करातमध्ये सूट मिळवण्यासाठी ईडीएमसीनं करदात्यांना आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिलाय.
केवळ मुली आहेत अशा व्यक्तींना मालमत्ता करात (प्रॉपर्टी टॅक्स) सूट देण्याचा निर्णय ईडीएमसी अर्थात पूर्व दिल्ली नगर निगम घेतलाय. या माता-पित्यांना ५.० टक्के सूट मिळणार आहे.
सोबतच, जर त्यांच्या मुली सरकारी शाळेत जात असतील तर त्यांना ८.० टक्के सूट मिळू शकते.
आर्थिक वर्ष २०१५-१६ साठी संशोधिक बजेट मांडताना त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलीय.