नवी दिल्ली : गु्न्ह्यात दोषी ठरलेल्याना आता गोपनीयपणे किंवा घाई घाईनं फाशी देता येणार नसल्याचं मत सुप्रिम कोर्टानं व्यक्त केलंय.
गुन्ह्यात दोषी ठरलेल्या गुन्हेगारांनाही आत्मसन्मान असतो. त्यामुळे दोषी ठरलेल्यांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची परवानगी दिली पाहिजे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.
उत्तर प्रदेशात २००८ मध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. या खटल्याच्या निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.के. सिक्री आणि न्यायमूर्ती यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने या दोघांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिलीय. शिवाय, एखाद्याला फाशिची शिक्षा सुनावल्यावर घटनेतील कलम २१ नुसार त्याचा जगण्याचा अधिकार लगेच संपुष्टात येत नाही, असंदेखील मत न्यायालयानं नोंदवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.