श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये आज सकाळी दहशतवादी हल्ला करण्यात आला. जम्मूच्या कटूहामध्ये दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झालेत. तर एक अतिरेकी ठार झाला. आत्मघातकी पथकाने हा हल्ला पोलिसांच्या राखीव सुरक्षा दलावर चढविला.
सध्या हे दहशतवादी पोलीस ठाण्याच्या आतमध्ये लपून बसले असून बाहेरील पोलिसांशी त्यांची तुफान धुमश्चक्री सुरू आहे. दरम्यान, या भागात पोलीसांची रहिवाशी वसाहत असल्याने दहशवाद्यांनी कोणाला ओलीस धरले आहे का, याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यावर सकाळी अतिरेक्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. तर एक जण ठार झाल्याचे सांगण्यात येत होते. याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ही बाब पुढे आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.