हिस्सार : बाबा रामपालच्या जाळ्यात कशा पद्धतीने लोक अडकले होते, ते आता हळूहळू समोर येत आहे. बाबाच्या खोट्या महिमेच्या आहारी गेलेल्या लोकांनी सांगितले की, बाबाला ज्या दुधाने अंघोळ घातली जायची त्या दुधाची नंतर खीर बनवली जायची.
ही खीर बाबाचे भक्त प्रसाद म्हणून खात होते. बाबाच्या अंधभक्तांनी सांगितले की, ही खीर खाल्याने चमत्काराची शक्यता वाढत असत. ४५ वर्षांचे भक्त मनोज याने सांगितले की, रामपालला ज्या दुधाने अंधोळ घातली जात होती त्या दुधाची खीर बनवली जायची. मनोज बाबाच्या सत्संगला आले होते. दरम्यान इतर भक्तांनी अशा प्रकारे खीर बनविली जात होती याची माहिती नसल्याचे सांगितले. बाबाच्या अंधोळीच्या दुधाची खीर बनत नव्हती पण ज्या दुधाची खीर बनविण्यात येत होती ते दूध आतील छताच्या पाईपमधून खाली यायचे.
बाबाला अटक करण्यात आली तेव्हा झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेले २९ वर्षाचे कृष्ण यांनी सांगितले की, बाबा जेव्हा ध्यान धारणा करायला बसत होते तेव्हा त्यांना दुधाने अंधोळ घालण्यात येत असत. याने ध्यानाचे आशीर्वाद दुधात येत असत आणि त्या दुधाचा प्रसाद म्हणून खीर बनविण्यात येत होती.
रामपालला अटक करण्याची कारवाई करताना पोलीस आणि समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात २०० जण जखमी झाले. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.