मिळवा... 'एटीएम'चे पाच ट्रान्झॅक्शन फ्री!

भारतीय रिझर्व्ह बँकेनं ‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदललेत तसंच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणलीय. नुकतंच, आरबीआयनं जाहीर केलेल्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दलचे नियम स्पष्ट केलेत. 

Updated: Oct 13, 2014, 09:41 AM IST
मिळवा...  'एटीएम'चे पाच ट्रान्झॅक्शन फ्री! title=

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं ‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदललेत तसंच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणलीय. नुकतंच, आरबीआयनं जाहीर केलेल्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दलचे नियम स्पष्ट केलेत. 

आत्तापर्यंत, मेट्रो शहरांमध्ये कोणत्याही ग्राहकाला दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून केवळ तीन ट्रान्झॅक्शन मोफत होते... १४ ऑगस्ट रोजी आरबीआयनं हा नियम लागू केला होता. मात्र, आता बदललेल्या नियमानुसार, जर एखाद्या ग्राहकानं एका महिन्याच्या कालावधीत सहा मेट्रो शहरांसहीत दुसऱ्या शहारांतही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ट्रान्झॅक्शन केलं तर त्याला पाच वेळा मोफत ट्रान्झॅक्शन मिळेल. यामध्ये, फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल दोन्ही पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्सचा समावेश असेल. 

कसं मिळवाल पाच ट्रान्झॅक्शन मोफत...
रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या नियमांप्रमाणे, मेट्रो शहरांत केवळ ३ ट्रान्झॅक्शन मोफत मिळतील. तीन पेक्षा अधिक ट्रान्झॅक्शनसाठी २० रुपये दरानं चार्ज लागेल. जर एखाद्या ग्राहकानं याशिवाय नॉन मेट्रो शहरांच्या एटीएममधून ट्रान्झॅक्शन केलं तरच त्याला इतर २ ट्रान्झॅक्शन मोफत मिळतील. यापद्धतीनं कोणताही ग्राहक मेट्रो शहरांच्या एटीएममधून ३ तर नॉन मेट्रो शहरांच्या एटीएममधून २ ट्रान्झॅक्शन... असे एकूण ५ ट्रान्झॅक्शन मोफत मिळवू शकेल.  

आरबीआयचे हे बदललेले नियम १ नोव्हेंबर २०१४ पासून सहा मोठ्या शहरांत लागू होतील. यामध्ये, मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये हे नियम लागू होतील.
याशिवाय, बँकेला हवं असेल तर ते आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी इतर बँकेत पाच पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स किंवा फ्री वापराची सुविधा ऑफर करू शकतात.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.