सोन्याच्या किमतीत घसरण, आता २६,७०० रुपये प्रति १० ग्राम

 कमकुवत आंतरराष्ट्रीय बाजार आणि सध्याच्या परिस्थितीत कमी झालेल्या दागिन्यांच्या विक्रीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत २७ हजारांहून २६,७०० वर आलीय. तब्बल ७२५ रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झालीय.

Updated: Aug 30, 2015, 01:52 PM IST
सोन्याच्या किमतीत घसरण, आता २६,७०० रुपये प्रति १० ग्राम  title=

नवी दिल्ली: कमकुवत आंतरराष्ट्रीय बाजार आणि सध्याच्या परिस्थितीत कमी झालेल्या दागिन्यांच्या विक्रीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत २७ हजारांहून २६,७०० वर आलीय. तब्बल ७२५ रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झालीय.

आणखी वाचा - जागतिक मंदीमुळे सोने झाले स्वस्त

शनिवारी राखीपौर्णिमेनिमित्त बाजार बंद होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आठवड्यात सोनं २.९ टक्क्यांनी घसरण झाली असून १,१२७.६७ डॉलर प्रति औंसवर बाजार बंद झाला. तर चांदी ५.८ टक्क्यांनी घसरण होत १४.४२ डॉलर प्रति औंसवर बाजार बंद झाला.

दागिने विक्रेत्यांच्या सतत खरेदीमुळे दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं आठवड्याच्या सुरुवातीला २७,५७५ रुपये आणि २७,४२५ रु. प्रति १० ग्रामवर उघडला. मात्र आतंरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत पणामुळे विक्रीवर परिणा झाला आणि किंमतही घसरली.  १० ग्रामसाठी २६,७०० रुपयांवर भाव आला. नाण्यांचे दरही १०० रुपयांनी कमी होत २२,५०० रुपये प्रति आठ ग्राम झाले. 

आणखी वाचा - शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा

तर चांदीच्या भावात १८०० रुपयांनी घसरण होत ३४,८०० रुपयांवर दर आले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.