बंगळुरू : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आज महिला कोणत्याही क्षेत्रात पुरूषांच्या मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर बाजू मारत आहे. पण हायजीन आणि महिलांच्या मुताऱ्यांची संख्याची कमतरता पाहता, महिलांना खूप अडचणींनना सामोरे जावे लागते.
महिलांना मूत्र विसर्जनाची सोय नसल्यामुळे अनेक आजारही उद्भवतात. मूतखडा, किडनीचा त्रास होऊ शकतो. यावर उपाय म्हणून एक डिव्हाइस तयार करण्यात आले आहे. त्याच्या आधारे महिला पुरूषांप्रमाणेच उभे राहून आपले मूत्र विसर्जन करू शकतात.
पाहूया या ड़िव्हाइसचे वैशिष्ट्ये.
- पुरूषांप्रमाणे महिलांना उभे राहून सू-सू करता येईल या उद्देशाने हे डिव्हाईस तयार करण्यात आले आहे.
- या डिव्हाइसच्या साहाय्याने महिला खराब पब्लिक टॉयलेट यूज करण्याची गरज पडणार नाही. खराब पब्लिक टॉयलेट सीटमुळे अनेक गंभीर आजार, इनफेक्शन होऊ शकते.
- भारतामध्ये पुरूषांपेक्षा अधिक महिलामध्ये मूत्र-संक्रमणाचे आजार होता. अशा वेळी त्या या डिव्हाइसचा वापर केला तर महिलांच्या आजारात घट येऊ शकते असा दावा डॉक्टरांननी केला आहे.
-ज्या महिलांना वाकण्याचा आणि बसण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे डिव्हाइस खूप फायदेशीर ठरू शकते.
- हे हँडी डिव्हाइस गर्भवती महिला आणि वयस्क महिलांसाठी वरदान ठरू शकते.
- हे डिव्हाइस खूप महाग नाही तसेच खूप जडही नाही. त्यामुळे महिला कॅरीबॅगमध्ये घेऊ जाऊ शकतात.
कसे काम करते हे डिव्हाइस - पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.