नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ तुम्ही ऑनलाईन काढण्याबरोबरच आता मोबाईलद्वारे काढू शकता.
देशातील सुमारे चार कोटी भविष्य निर्वाह निधीच्या सर्व खातेदारांना आपला पीएफ मोबाईल द्वारे काढता येणार आहे. त्यासाठी लवकरच 'उमंग' नावाचं एक अँड्रोईड अॅप ल़ॉन्च करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकराने स्पष्ट केलेय.
'उमंग' या अॅपद्वारे पीएफ काढण्यासाठी अर्ज करता येणार आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच मंजूर करण्यात येतील, असेही केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रेय यांन स्पष्ट केले आहे. त्यामुळे पीएफ काढणे अधिक सोपे झाले नाही.