www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. १ जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे. याचा फायदा देशातल्या ५० लाखांहून अधिक कार्यरत आणि ३० लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं यंदाची दिवाळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जोरात होणार हेच दिसतंय.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या ८० टक्के महागाई भत्ता दिला जातो. त्यात १० टक्यांही नी वाढ करून तो ९० टक्के करण्यात येणार आहे. औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या ९० टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय. औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी ३१ जुलैअखेर महागाई निर्देषांक ११.०६ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, हा आकडा जूनमध्येच ११.६३ वर गेल्याचं दिसून आलंय.
गेल्या तीन वर्षांत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन अंकी संख्येनं पहिल्यांदाच वाढ होतेय. यापूर्वी याच वर्षी एप्रिलमध्ये भत्त्यात 8 टक्यांंच नी वाढ करण्यात आली होती. तर १ जानेवारीपासून ही वाढ लागू करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.