नवी दिल्ली: बजेट 2015-16मध्ये सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ करण्यात आलीय. 12.36 वरुन 14 टक्के सर्व्हिस टॅक्स करण्यात आला. 1 जूनपासून हा नवा सर्व्हिस टॅक्स लागू होणार आहे. त्यामुळं आता रेस्टॉरंटमधील जेवण, विमा क्षेत्र आणि फोन बिल सारख्या गोष्टी महागणार आहेत.
आपल्या बजेट भाषणात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं की, केंद्र आणि राज्यांतील सेवांवर सर्व्हिस टॅक्सला लागू करण्यासाठी सध्याचा सर्व्हिस टॅक्ल 12.36 टक्क्यांसह (शैक्षणिक उपकर) मिळून 14 टक्के केला जातोय.
काही वस्तूंवर सोडून सर्व सेवांवर सर्व्हिस टॅक्स लावला जातो. जाहिरात, विमान प्रवास, आर्किटेक्टच्या सेवा, काही नवीन निर्मिती, क्रेडिट कार्ड, कार्यक्रम प्रबंधन, टूर ऑपरेटरसारख्या महत्त्वपूर्ण सेवांवर सर्व्हिस टॅक्स लागतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.