नवी दिल्ली : ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चाट पडणार आहे. विनाअनुदानीत सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 38.50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
आज मध्यरात्रीपासून विनाअनुदानीत सिलेंडरसाठीचे हे नवे दर लागू होणार आहेत. या नव्या किमतीनंतर दिल्लीमध्ये आता 529 रुपयाला विनाअनुदानीत सिलेंडर मिळणार आहे.