नवी दिल्ली : गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध वर्गातील लोकांशी चर्चा करणार आहेत. राजनाथ सिंह आज लेह आणि 4 ऑक्टोबरला कारगिलचा दौरा करणार आहे.
राजनाथ सिंह या दौऱ्यादरम्यान विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी आणि लोकांशी चर्चा करणार आहेत. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसा आणि अशांती याबाबत ते लोकांशी बोलणार आहेत.
८ जुलैला हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणी हा जवानांसोबतच्या चकमकीत मारला गेला होता. जम्मू-काश्मिरात सुरु झालेल्या हिसांत्मक वातावरणानंतर गृहमंत्र्यांचा हा चौथा दौरा आहे.