भोपाळ : मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाने सिमीच्या दहशतवाद्यांच्या एनकाउंटरवर शिवराज सरकार आणि पोलिसांकडे उत्तर मागितलं आहे. मानवाधिकार आयोगाने १५ दिवसात या प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे.
सोमवारी मध्यप्रदेश पोलिसांनी सिमीच्या 8 फरार दहशतवाद्यांना चकमकीतत ठार केलं होतं. आठही दहशतवादी भोपाळच्या सेंट्रल जेलमधून गार्डची हत्या करुन फरार झाले होते.
मध्यप्रदेश पोलिसांनी ८ तासात या दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं होतं. सिमीचे हे आठही दहशतवादी रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास जेलची भींत तोडून फरार झाले होते. एंकाऊंटरचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या एनकाउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.