मथुरा : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान उतरविण्याचा यशस्वी प्रयोग, यमुना द्रुतगती मार्गावर आज पहिल्यांदा करण्यात आला.
यमुना द्रुतगती मार्गावर मथुरा शहराजवळ हवाई दलाचे मिराज हे लढाऊ विमान, आज सकाळी दोनवेळा उतरविण्यात आले. यामुळे मात्र द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.
इमरजन्सीच्या काळात द्रुतगती मार्गावर विमान उतरविणे कितपत सुरक्षित आहे, याची चाचणी घेण्यासाठी हे विमान उतरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रेटर नोएडा ते आग्रा असा हा १६५ किमी अंतराचा द्रुतगती मार्ग आहे.
केंद्रातील एनडीए सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त २५ मे रोजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मथुरा येथे सभा होणार आहे. त्याठिकाच विमान उतरविण्याची चाचणी घेण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.