www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जिथे पाहावं तिथं बर्फ.. पांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणी झालीय. हिवाळ्यातल्या पहिल्या बर्फवृष्टीनं काश्मिर, हिमाचलप्रदेशमध्ये सध्या हे असं नयनमनोहर दृष्य पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं ज्याठिकाणी नजर टाकाल त्याठिकाणी बर्फच बर्फ... काश्मिरच्या पटनी टॉप, नत्थाटॉप या पर्यटन स्थळांवर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळचंय.
हिमाचल प्रदेश, काश्मिर, उत्तराखंडमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकही मनमुराद आनंद लुटतायत... गुलमर्ग आणि किश्तवाडमध्ये तर एक फूट बर्फ जमा झालाय. एकीकडे पर्यटकांसाठी पर्वणी झालेली बर्फवृष्टी काश्मिरच्या स्थानिकांसाठी मात्र थोडीशी त्रासदायकच असते.. बर्फवृष्टीमुळे रस्ते जॅम होतात. मालाची ने आण होणं त्रासदायकच होतं.
काश्मिरमध्ये सध्या वैष्णोदेवी यात्रेचाही हंगाम आहे. पहिल्या आठवड्यात त्याठिकाणीही बर्फवृष्टी झाली. मात्र बर्फवृष्टी झाली असली तरी भाविकांचा उत्साह कायम आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.