नवी दिल्ली : हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
पत्राद्वारे दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर हा हाय अलर्ट जारी करण्यात आला. विशेष म्हणजे एअर इंडियांच्या विमानात बॉम्बची अफवा आणि आत्मघाती हल्ल्याच्या शक्यतेने खळबळ माजली आहे. अलर्टनंतर देशभरातील विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
यात मुंबई, कोलकाता आणि कोच्ची एअरपोर्टचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर पुढील दोन दिवसांसाठी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारा हा खुलासा झाला की मुंबई किंवा अहमदाबादच्या विमानाला टार्गेट करण्यात येणार आहे. त्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला.
या अलर्टनंतर विमानांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच सुरक्षा दुप्पट करण्यात आली. एनएसजीच्या हायजॅकिंग टीमलाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.