चेन्नई : तामिळनाडूनच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे जयललिता यांना चेन्नईच्या मरिना बीचवर मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. लाखोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात जयललिता यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले.
#WATCH: Funeral procession of #Jayalalithaa underway, to be buried at MGR memorial, Marina Beach in Chennai. pic.twitter.com/8G87nNsiix
— ANI (@ANI_news) December 6, 2016
जयललिता यांच्यावर जनसागराच्या उपस्थितीत हिंदू ब्राम्हण रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे दहन न करता दफन करण्यात आले. जयललितांच्या विश्वासू सहकारी शशिकला यांनी त्यांच्या पार्थिवावर शेवटचे विधी केले.
Chennai: Earlier visuals of Last rites ceremony of #jayalalithaa at MGR Memorial, Marina Beach pic.twitter.com/vsbEDjwN69
— ANI (@ANI_news) December 6, 2016
जयललिता यांचे राजकीय मार्गदर्शक आणि माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्या स्मारकाशेजारीच जयललिता यांचे पार्थिवाचे दफन करण्यात आले. राजाजी हॉल ते मरिना बीच या अंत्ययात्रेच्या मार्गावर जनसागर लोटला होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांनी एकच गर्दी केली होती. आपल्या लाडक्या अम्मांना अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात होता.
Last rites of #jayalalithaa to take place at Marina Beach in Chennai shortly, funeral procession underway. pic.twitter.com/Sm33wGczbV
— ANI (@ANI_news) December 6, 2016