कोची : केरळमधील मल्लपूरम शहरा जवळील कोडिन्ही गावात जगभरातील मीडिया आणि मेडिकलचा अभ्यास करणाऱ्यांचा माहोल दिसून येत आहे. या गावात सर्वात जास्त जुळी मुले जन्माला येत आहेत. कोडिन्ही गावात १००० जुळी मुले आहेत.
या जुळ्या मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाचा त्यांना गराडा पडत आहे. त्यांचे बाईट घेण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या मुलांना मुलाखत देण्यास कुटुंबीयांनी विरोध केलाय.
गावातील लोकांनी स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली आहे की, कोणत्याही मीडियाला मुलाखत घेण्यास बंदी घालावी. तसेच ज्यांनी व्हिडिओ शुटींग केले आहे आणि मुलाखत गेतल्या आहेत, त्या परत मागवून त्यावर बंदी घालावी.
तर काही ग्रामपंचायतनी विरोध केलाय. याबाबत एक बैठक घेतली. ग्रामीण भागातील मुलांचे हे एक प्रकारे शोषण आहे. ते थांबविण्यात येणे. तसेच हे शोषण थांबविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत जुळे मुलांसह प्रसिद्ध व्यक्ती आणि मुलांचे नातेवाईक यांना घेतले जाणार आहे. याबाबत १५ जानेवारीला बैठक बोलावली आहे.