डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर 30 जुलैला रामेश्वरममध्ये अंत्यसंस्कार

कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम इथल्या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. 

Updated: Jul 29, 2015, 08:41 AM IST

नवी दिल्ली : डॉ. अब्दुल कलाम यांचं पार्थिव आज सकाळी कलाम शिलाँगहून गुवाहाटी इथं आणण्यात आलं. तिथं आसामाचे मुख्यमंत्री तरूम गोगोई यांनी पुष्पचक्र अर्पण करून कलाम यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव विशेष विमानानं राजधानी दिल्लीत आणलंय. तेव्हा प्रोटोकॉल मोडून राष्ट्रपती आणि पंतप्रधान विमानतळावर उपस्थित होते.  

त्यानंतर डॉ. कलाम यांचं पार्थिव १०, राजाजी मार्ग या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम इथल्या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. 

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं पार्थिव आज दुपारी वायुसेनेच्या विमानानं दिल्लीत आणलं गेलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी, डॉ. कलाम यांच्या पार्थिव शरीराला तिरंग्यात सन्मानासहीत लपेटण्यात आलं होतं. 

सोबतच, तीन्ही दलांच्या प्रमुखांनी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, दिल्ली पोलीस आयुक्त बी एस बस्सी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांसहीत मान्यवर व्यक्ती डॉ. कलामांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर झाले होते. 

अब्दुल कलामांचं व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांचे सगळ्या राजकीय पक्षांशी असणारे जवळकीचे संबंधं. आज डॉ. कलाम यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर दोन्ही सभागृहात आदरांजली मिनिटभराचं मौन पाळण्यात आलं. यानंतर लोकसभा 2 दिवसांसाठी तर राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलीय. 
दरम्यान भाजपच्या संसदीय पक्षांच्या बैठकीत डॉ.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. कलाम यांना वाहिली श्रद्धांजली
 

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.