www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तब्बल ४६ वर्षांची प्रतिक्षा फळाला आलीय. आज, राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजुर करण्यात आलंय. यामुळे देशभरात अण्णां हजारेंच्या आंदोलनाला यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय.
कपिल सिब्बल यांनी आज लोकसभेत सुधारित लोकपाल विधेयक मांडलं. यावर, भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी भाजपचा लोकपाल बिलाला संपूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर करत या विधेयकाचं संपूर्ण श्रेय अण्णा हजारेंना दिलं तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्व पक्षांनी एकमतानं लोकपाल विधेयकाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं.
परंतु, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी मात्र आपल्या पक्षाचा या विधेयकाला विरोध असल्याचं सांगत सभात्याग केला. या गोंधळातच लोकसभेत लोकपाल विधेयकावर मतदान घेण्यात आलं... आणि अखेर ४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लोकपाल विधेयकाला मंजुरी मिळालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.