कोयंबतूर : कोयंबतूर येथील ५० वर्षीय एका व्यक्तीने आपल्या भांडखोर पत्नीला घाबरविण्यासाठी गळ्यात फाशीचा दोर अडकविला आणि खुर्चीवर उभा राहिला. पण खुर्ची पडली आणि तो दोर आवळला गेला आणि फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची पत्नी आणि शेजारच्यांनी त्याला खाली उतरविले. सरकारी रुग्णालयात नेले असता उपचारावेळी त्याची प्राणज्योत मालवली. सुलुर येथील निवासी सौंदरराजन एका खाजगी कंपनीत काम करीत होता. नेहमी घरी उशीरा येत होता. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे नेहमी भांडण होत असत.
बुधवारी रात्रीही त्याचे भांडण झाले. भांडणानंतर त्याने पत्नीला धमकावले की त्याला छळणे बंद केले नाही तर तो आत्महत्या करेल. पत्नीने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर तो खूर्चीवर चढला, पंख्याला दोरी बांधली आणि फाशीचा दोर गळ्यात अडकवला. पोलिसांनी सांगितले की, खुर्ची खाली पडली, त्याला गळफास बसला आणि त्याच त्याचा दम घोटला गेला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.