पतीनं केलं पत्नीच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन आणि...

गुजरात हायकोर्टाच्या समोर एक वेगळंच प्रकरण समोर आलंय. एका नवऱ्याने आपल्या बायकोचा पगार जाणून घेण्यासाठी चक्क तिच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन केलंय.

Updated: Apr 12, 2015, 05:14 PM IST
पतीनं केलं पत्नीच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन आणि...  title=

सुरत : गुजरात हायकोर्टाच्या समोर एक वेगळंच प्रकरण समोर आलंय. एका नवऱ्याने आपल्या बायकोचा पगार जाणून घेण्यासाठी चक्क तिच्या ऑफिसमध्ये स्टिंग ऑपरेशन केलंय.

राजेश पटेल आणि मीना पटेल यांच्या घटस्फोटाचं प्रकरण सुरत कोर्टात सुरू आहे.  सुरत कोर्टानं २५ हजार रुपये महिना पोटगी स्वरूपात मीनाला देण्याचे आदेश राजेशला दिले होते. 

यावर, मीना स्वत: एका इंजिनिअरिंग फर्ममध्ये काम करते, तिला १७ हजार पगार आहे... त्यामुळे तिला पोटगीचा अधिकार नाही, असं सांगत न्यायालयाच्या निर्णयाला हरकत घेतली. 

त्यानंतर, राजेशनं चक्क एक व्हिडिओच न्यायालयासमोर सादर केला. या व्हिडिओमध्येऑफिसमध्ये काम करणारी महिला म्हणजे आपली बायको मीना असल्याचा दावा राजेशनं केला. 

यावर, साक्षीदार म्हणून ज्या ऑफिसमध्ये हा व्हिडिओ बनवण्यात आला होता त्या कंपनीच्या मालकाला न्यायालयासमोर बोलावण्यात आलं. त्यानं मात्र मीना आपल्या कंपनीत काम करत नसून व्हिडिओमध्ये दिसणारी महिलाही मीना नसल्याचं सांगितलं. 

यानंतर, राजेशनं कंपनीचे अकाऊंट बूक कोर्टात सादर करण्याची याचिका सादर केली होती, ज्यातून मीनाच्या पगाराचा खुलासा होईल. मात्र कोर्टाने राजेशची मागणी फेटाळली. 

मीनानं मात्र हा व्हिडिओच एडिट असल्याचं सांगितलंय. हायकोर्टाने व्हिडिओची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी फॅमिली कोर्टात अपील करू शकते, असं मीनाला सांगितलंय.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.