मुंबई : आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांना, राजस महेंदळे या मुलाने प्रश्न विचारला आणि रघुराम राजन यांना थोडा वेळ धक्का बसला, जेवढा प्रश्न सुंदर होता, तेवढंच सुंदर उत्तर राजन यांनी राजसला दिलं, राजस हा सिस्टर निवेदिता स्कूल डोंबिवलीचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे.
बाहेर देशातील आर्थिक घटनांच्या अफवेनेही आपली अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील यांची चर्चा सुरू होते, रूपया घसरायला सुरूवात होते, तेव्हा असे दिवस कधी येतील, जेव्हा आपल्या निर्णयाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळतील? असा प्रश्न आरबीआय गव्हर्नर यांना विचारण्यात आला.
रघुराम राजन यांनी तेवढंच सुंदर उत्तर दिलंय, ते म्हणाले, आपली अर्थव्यवस्था वाढत जातेय, आणि तुम्ही माझ्या वयाचे व्हाल, तोपर्यंत आपण जगातील सर्वात महत्वाच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असू आणि आपल्या निर्णयांचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येतील. आपण तेव्हा फक्त भारताचाच नाहीतर जगाचाही विचार करून निर्णय घेऊ, अशी वेळ येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.