मोदींचं ‘नमो गुजरात’ दुसऱ्याच दिवशी `ब्लॅक आऊट`

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ‘नमो गुजरात’ या मोदींच्या टीव्ही चॅनलवर बंदी घातलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 8, 2012, 03:30 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ‘नमो गुजरात’ या मोदींच्या टीव्ही चॅनलवर बंदी घातलीय. या चॅनेलला गृहीत धरून मोदींनी आपल्या प्रचारसभेचं चांगलंच नियोजन केलं होतं. पण, आयोगाच्या या निर्णयामुळं मोदींच्या मनसुब्याला चांगलाच धक्का बसलाय.
गुजरात निवडणुका तोंडावर आल्या असताना निवडणूक आयोगानं ‘नमो गुजरात’ या चॅनलला ब्लॅक आऊट करण्यात आलंय. या चॅनलवरुन मोदींच्या सर्व प्रचार सभा लाईव्ह दाखवण्याचं नियोजन होतं. या चॅनलचा उपयोग मोदींच्या निवडणूक प्रचारासाठी होत असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं या नमो गुजरातच्या प्रसारणावर बंदी आणण्यात आलीय. जेव्हापर्यंत या चॅनलला क्लिअरन्स मिळणार नाही तोपर्यंत या चॅनेलचं प्रक्षेपण होणार नाही, असा आदेशच निवडणूक आयोगानं ब्रॉडकास्टर्सना दिलाय. चॅनल लॉन्चिंगच्या दुसऱ्याच दिवशी हे चॅनल ब्लॅक आऊट करण्यात आल्यानं या दृश्यं माध्यमाचा मोदींना मात्र शून्य वापर होणार आहे.