नवी दिल्ली : भाजपच्या विजयाचे शिल्पकार तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंग आणि महासचिव अमित शाह असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भाजपच्या विजयी टीमचे कर्णधार राजनाथ तर मॅन ऑफ द मॅच अमित शाह असल्याचे म्हटले.
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय परिषदेत आज दिल्लीत झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी मोदींनी हा विशेष उल्लेख केला. या परिषदेमुळे अमित शहा यांच्या नेतृत्वावर मोदींकडून शिक्कामोर्तब झाले.
यावेळी मोदींना काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही काँग्रेसने धडा घेतलेला नाही. त्यांनी मतांचे राजकारण सुरुच ठेवले आहे. काँग्रेस समाजात फुट पाडण्याचे काम करीत आहे. देशात लहान मोठ्या घटना घडत आहेत. हिंसा सारख्या घटनांचा भाजप कधीही पाठिशी घालणार नाही. भाजपला विकास, शांती आणि प्रगती हवी आहे. 'सबका साथ, सबका विकास' हा आमचा मूलमंत्र असल्याचे मोदी म्हणालेत.
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठे यश मिळवून देण्यात अमित शाह यांचा मोठा वाटा आहे. शाह यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय योग्य होता. सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्याचे श्रेय मी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला देतो, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग म्हणालेत.
भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेनंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना मार्गदर्शन आणि सूचना केल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.