आत्मघाती हल्ल्यासाठी भारतात पाठविणाऱ्यांना ठार मारण्याची नावेदची इच्छा

Updated: Aug 17, 2015, 02:44 PM IST
आत्मघाती हल्ल्यासाठी भारतात पाठविणाऱ्यांना ठार मारण्याची नावेदची इच्छा  title=

 

नवी दिल्ली :  उधमपूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी बीएसएफच्या बसवर हल्ला केल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. 

मजेसाठी हिंदूंना मारण्यास भारतात आलेला दहशतवादी नावेद आता पाकिस्तानात जाऊन त्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना ठार करू इच्छितो ज्यांनी त्याला आत्मघाती हल्ल्यासाठी भारतात पाठविले आहे. नावेदने तपास यंत्रणांना सांगितले की, फैसलाबाद येथे लष्कर-ए-तोयबाशी संबंधी एका मौलवीने मला पाहिले, त्यापूर्वी माझे आयुष्य खूप वेगळे होते. माझ्या आयुष्याचे कोणतेही लक्ष्य नव्हते. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, नावेदला एकदा जुगार खेळण्यासाठी घरातून चोरी करताना पकडले होते. त्याने सांगितले की त्याच्या आयुष्याचे कोणतेही ध्येय नव्हते. त्यावेळी फैसलाबादच्या एका मशिदीतील लष्करचा मौलवी बशीर याने मला पाहिले. बशीर माझा उस्ताद बनला आणि त्याने माझ्या डोक्यात जीवनातील ध्येय भरले आणि जेहादी बनवले. 

नावेदला पाकिस्तानातील पंजाबमध्ये ट्रेनिंग देण्यात आली. लष्करने त्याला भारतात विशेषतः काश्मिरमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडिओ दाखविले. त्यानंतर त्याला तीन प्रकारचे प्रशिक्षण दिले. फिजिकल फिटनेस, दुसरे हत्यार चालविणे आणि तिसरा आत्मघाती हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर २ जून रोजी त्याला भारतात पाठविले. 

तपास यंत्रणांनी सांगितले की, नावेदने पाचवीनंतर शाळा सोडली. त्यानंतर त्याने जुगार खेळण्यात आपला वेळ घालविला. त्याला भारतात येण्यासाठी लष्करकडून ५० हजार रुपये देण्यात आले. त्यातील सर्व पैसे दहशतवादी अबु कासिमने ठेवले आणि फक्त खर्चासाठी दोन हजार रुपये नावेदला दिले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.