नवी दिल्ली: मी घाई मध्ये आहे, मला टी 20 मधल्या बॅट्समनसारखं खेळून पुढच्या तीन वर्षांमध्ये विकास करायचा आहे, असं वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
तसंच पैसा आणि साधनांचा तुटवडा नाही, पण अधिकाऱ्यांचं काम माझ्या स्पीडनं चालत नसल्याची खंतही गडकरींनी व्यक्त केली आहे. हायवेवर प्रत्येक 100 मीटरनंतर स्पीड ब्रेकर असतो, पण या सरकारी सिस्टिममध्ये प्रत्येक पावलावर स्पीड ब्रेकर आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत.
अल्पवयीन मुलांच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये कायद्यात बदल करून त्यांच्या आई-वडिलांना शिक्षा करण्याबाबत कायदा करणार असल्याचं वक्तव्य गडकरींनी केलं आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या केंद्रीय मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये वाहन कायदा आणता आला नाही हा काळा धब्बा असल्याचंही गडकरी बोलले आहेत.