नवी दिल्ली : नव्या वर्षात तेल कंपन्यांनी आम आदमीला चांगलेच महागाईचे गिफ्ट दिले. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली मात्र दुसरीकडे विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आलीये. विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ५१ रुपयांनी वाढ झालीये.
दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमती ४९.५० रुपयांनी वाढून त्या ६५७.५० रुपये झाल्यात. तर मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५१ रुपयांची वाढ करण्यात आलीये. या नव्या किंमती मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्यात.
तेल कंपन्यांकडून गुरुवारी मध्यरात्री पेट्रोलच्या किंमतीत ६३ पैसे तर डिझेलच्या किंमतीत १.०६ रुपयांनी कपात करण्यात आलीये.