नवी दिल्ली : काँग्रेसला अकबर रोडवरील कार्यालय खाली करण्याचे आदेश शहरी विकास मंत्रालयाने दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरी विकास मंत्रालयाने हे आदेश दिले आहेत. काँग्रेस कार्यालयाचा भाडे करार संपुष्टात आल्यानंतर काँग्रेसला ही नोटीस देण्यात आली आहे.
काँग्रेसचं अकबर रोडवरील हे कार्यालय काँग्रेससाठी ऐतिहासिक आहे, या कार्यालयात देशाच्या राजकारणातील अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहेत.
रामदास आठवले यांचंही काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या घरातून सामान बाहेर काढण्यात आलं होतं, त्याप्रमाणे काँग्रेसने कार्यालय खाली न केल्यास त्यांचंही साहित्य बाहेर काढा असं आरपीआय नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.