काश्मीर दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं, ११ जवान शहीद

तिस-या टप्प्याच्या मतदानाआधीच दहशतवादी हल्ल्यांनी काश्मीर हादरलं, काश्मीरमध्ये काल दिवसभरात चार दहशतवादी हल्ले कऱण्यात आले. यात हल्याच्यावेळी ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात ११ जवान शहीद झालेत.

Updated: Dec 6, 2014, 10:11 AM IST
काश्मीर दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं, ११ जवान शहीद title=

जम्मू-काश्मीर : तिस-या टप्प्याच्या मतदानाआधीच दहशतवादी हल्ल्यांनी काश्मीर हादरलं, काश्मीरमध्ये काल दिवसभरात चार दहशतवादी हल्ले कऱण्यात आले. यात हल्याच्यावेळी ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात ११ जवान शहीद झालेत.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तिस-या टप्प्याआधी जम्मू-काश्मीर काल दहशतवादी हल्ल्यानं हादरलं. वेगवेगळ्या ठिकाणी बारा तासांच्या आत चार दहशतवादी हल्ले झाले. यात ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. मात्र सैन्याचे ११ जवान शहीद झाले. पहिला हल्ला उरीमधल्या मोहारा आर्मी कॅम्पमध्ये दहशतवादी घुसले... त्यात ५ दहशतवादी मारले गेले.

दुसरा हल्ला सौरा पोलीस नाका, श्रीनगर इथं झाला. पोलिसांच्या चेक पोस्टवरच हा हल्ला करण्यात आला. याठिकाणी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

तिसरा हल्ला शोपियां पोलीस स्टेशन इथं झाला. दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला केला.

चौथा दहशतवादी हल्ला दक्षिण काश्मीर इथं त्राल बस स्टॅन्ड इथं झाला. दहशतवाद्यांनी बस स्टॅन्डवर ग्रेनेड डागले. त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.