www.24taas.com, झी मीडिया, इटावा
उत्तर प्रदेशातील इटावा गावात खाप पंचायतीने बलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं फर्मान काढलं आहे. या गोष्टीला मानवाधिकार संघटनेचे लोक विरोध करत आहेत. मात्र पंचायतवाले आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार जणांना पंचायतीने जिवंत जाळण्याची शिक्षा फर्मावली आहे. जर पोलीस कारवाई करण्यात उशीर करत असतील, तर आम्हीच ही कारवाई करू अशी पंचायतीने पोलिसांसमोरची सूचना दिली आहे. पंचायतीने कायदा आपल्या हातात घेऊ नये, यासाठी पोलिसांनी सरपंचांना आणि इतर पंचांना विनंती केली आहे.
४ मे रोजी एका १५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला होता. या चारपैकी एकाला पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी यासंदर्भात सांगितलं, की आम्ही पंचायतीवर अशी वेळ येऊ देणार नाही. बलात्काऱ्यांवर आम्हीच कारवाई करू.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.