पानीपत : पानीपतच्या तिस-या युद्धाला आज २५६ वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने काला आम या ठिकाणी शौर्य दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला हरियाणातील आणि महाराष्ट्रातील हजारो लोक सहभागी झाले. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे आणि बोधले महाराज उपस्थित होते.
देशाच्या अस्मितेसाठी मराठ्यांनी लढा दिला. शहीदांना नमन करण्यासाठी सुप्रीम कोर्टतील ववकील आणि महाराष्ट्र सुरक्षा हंसातील पोलिसांनी पानीपत येथे उपस्थित होते. जय शिवारायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून निघाला.
दरम्यान, मराठ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच पानीपत येथे काला आम परिसर जागतिक पातळीवरचे केंद्र करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तर येथील अभ्यासक्रमात मराठी भाषा शिकवण्यावर भर देणार असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली.