दादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!

उत्तर प्रदेशातल्या दादरीतल्या घटनेची पंतप्रधानांनी चुप्पी साधली असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतलीय. 

Updated: Oct 7, 2015, 05:12 PM IST
दादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन! title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या दादरीतल्या घटनेची पंतप्रधानांनी चुप्पी साधली असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतलीय. 

'समृद्ध अशा प्राचीन संस्कृतीनं हा देश नटलेला आहे. आणि या विविधतेचं एकतेची देणगी असलेल्या या देशातल्या जनतेनं या संस्कृतीचा आदर करायला हवा' अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.तर दुसरीकडे पंतप्रधानांनी मात्र या विषयावर अजूनही मौन बाळगलंय.

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर ट्विट करणाऱ्या पंतप्रधानांनी दादरी प्रकरणाबद्दल भाष्य केलेलं नाही, यावरून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जोरदार हल्ला चढवलाय.

माजी क्रिकेटर आणि भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू डीव्हीटी (रक्ताच्या गाठी) या जीवघेण्या आजारावर उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. यावर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

यानंतर, ओमर अब्दुल्ला यांनीही पंतप्रधानांवर टीका केलीय. एका हत्याकांडापेक्षा पंतप्रधानांना सिद्धू यांच्या प्रकृतीची काळजी आहे... असं ट्विट त्यांनी केलंय.   

 

 उत्तरप्रदेशातल्या दादरी २९ सप्टेंबर रोजी गायीचं मांस खाल्ल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलख यांना घरातून बाहेर ओढत त्यांची जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावर अळीमिळी गुपचिळी पाळणाऱ्या देशावर आणि पंतप्रधानांवर लेखिका नयनतारा सेहगल आणि कवी अशोक वाजपेयी यांनी टीका करत आपला 'साहित्य अकादमी' पुरस्कार परत केला होता.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.