नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानचा सीमेपलीकडून होणारा सतत गोळीबार आणि सीमेवरील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सेनाप्रमुखांशी आज सुरक्षा स्थितीचा आढावा घेत बैठक घेतली. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हे देखील उपस्थित होते.
बैठकीत पंतप्रधानांनी नियंत्रण रेषेच्या आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. नागरिकांना आणि सैन्याला लक्ष्य केलं जात आहे.
सेनाप्रमुख जनरल दलवीर सिंह सुहाग यांनी मोदींना स्थितीबाबत माहिती दिली. पाकिस्तानकडून भारताला उकसवण्याचा प्रयत्न होत आहे. आज पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. नवशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे.