काँग्रेस, आपवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

दिल्लीत मतदानाला काही दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहे. दिल्लीमध्ये कॉंग्रेसने १५ तर आम आदमी पक्षाने अर्थात आपने एक वर्षे वाया घालवले आहे, असा जोरदार हल्लाबोल करताना तुमचे स्वप्न ते माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनिक साद मतदारांना घातली आहे.

Updated: Feb 3, 2015, 05:46 PM IST
काँग्रेस, आपवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल title=

नवी दिल्ली : दिल्लीत मतदानाला काही दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहे. दिल्लीमध्ये कॉंग्रेसने १५ तर आम आदमी पक्षाने अर्थात आपने एक वर्षे वाया घालवले आहे, असा जोरदार हल्लाबोल करताना तुमचे स्वप्न ते माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनिक साद मतदारांना घातली आहे.

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या प्रचारादरम्यान मोदी बोलत होते. दिल्लीत आपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नरेंद्र मोदी हे प्रचार सभेत गुंतले आहेत. आक्रमकपणे त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

कॉंग्रेसने १५ वर्षांत कोणतीही जबाबदारी पाळली नाही. तसेच 'आप'नेही एक वर्षे वाया घालवले आहे. दिल्लीला विकासाची गरज आहे. आपण एकत्र येऊन शहराचा विकास करू या, असे हाक मोदी यांनी दिली आहे. दिल्ली शहर हे राजधानीचे शहर आहे. शहरावर मोठी जबाबदारी आहे, असे मोदी म्हणालते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.